तापसी पन्नूने या खेळाडूला दिलेय आपले हृदय


फोटो साभार झी न्यूज
बॉलीवूड मधील गुणी अभिनेत्री तापसी पन्नूने एका मुलाखतीत तिच्या रिलेशनशिप बद्दल खुलासा केला असून सध्या ती बँडमिंटनपटू मथियास बो याच्याबरोबर डेटिंग करते आहे. जुडवा २, मिशन मंगल आणि पिंक सारख्या चित्रपटातून तापसीने तिच्या उत्तम अभिनयाचे दर्शन घडविले आहे. तापसी सांगते तिला मथियास बरोबरचे नाते लपविण्याची इच्छा नाही. या नात्याची माहिती तिच्या घराच्या लोकांनाही आहे.

बॉलीवूड लाईफ डॉट कॉमच्या बातमीनुसार तापसीची आई निर्मलजीत कौर या तापसीसाठी नेहमीच ढाल बनून उभ्या असतात. त्या तापसीच्या लग्नाबाबत म्हणाल्या, आमचा तिच्यावर लग्नासाठी कोणताही दबाव नाही. तिने लग्न करावे ही आमची इच्छा आहेच पण कधी करायचे याचा निर्णय तिनेच घ्यायचा आहे.

तापसी लग्नाविषयीची कल्पना सांगताना म्हणाली, तिला डामडौल किंवा धूमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा नाही. लग्न अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत, शांत आणि साधेपणाने व एक दिवसात व्हावे. लग्नात गर्दी नको आणि लग्न समारंभ चार दिवसांचा नको असेही तिला वाटते. तापसीच्या लग्नाबाबत तिचे चाहतेही उत्सुक आहेत.

२०२० मध्ये ती थप्पड चित्रपटात दिसली होती. तिचे हसीन दिलरुबा, लूप लपेटा आणि शाबास मिंटू हे आगामी चित्रपट असून सध्या तिने सर्व लक्ष करियरवर केंद्रित केले आहे.

Leave a Comment