उर्वशी रौतेलाने कोविड १९ लढाईसाठी दान दिले ५ कोटी


फोटो साभार जागरण
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने करोना कोविड १९ विरुद्ध सुरु असलेल्या लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला असून तिने ५ कोटी रुपये दान दिले आहेत. तिने हे पैसे टिकटॉकच्या डान्स मास्टरक्लास मध्ये कमावले होते. ही रक्कम तिने क्राय, युनिसेफ आणि स्वदेशी फौंडेशनला दिली असून त्याचा वापर कोविड विरुध्द सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये केला जाणार आहे.

या मास्टरक्लास मध्ये उर्वशी रौतेलाने लोकांना झुम्बा, टबाटा, व लॅटीन डान्स शिकविले आणि हे क्लास पूर्ण मोफत होते. या डान्स क्लास मध्ये १.८ कोटी लोक सामील झाले आणि त्यातून उर्वशीला ५ कोटी रुपये मिळाले असे समजते.

उर्वशी या संदर्भात म्हणाली, नेते, अभिनेते, खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिक या संकटकाळात मदतीसाठी पुढे आला आहे त्या सर्वाना धन्यवाद. ही वेळच अशी आहे की सर्वांनी एकत्र उभे राहायला हवे. एकमेकांना सपोर्ट करायला हवे. त्यात कोणतीच देणगी छोटी नाही आणि मोठीही नाही. आपण सर्वानी एकत्र येऊन करोनाचा पराभव करायचा आहे. इतकेच नव्हे तर भविष्यातही गरजेनुसार मदतीसाठी तयार राहायचे आहे.

Leave a Comment