6 कॅमेरावाला ‘व्हिवो व्ही19’ भारतात लाँच

व्हिवोने आपला नवीन स्मार्टफोन व्ही19 भारतात लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात ड्युअल सेल्फी कॅमेरा, 4500 एमएएच बॅटरी आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर दिला आहे. व्हिवो व्ही19 स्मार्टफोनच्या 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 27,990 रुपये आणि 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 31,990 रुपये आहे. हा फोन काळ्या आणि सोनेरी रंगात मिळेल. 15 मे पासून अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वेबसाईट्सवर फोनची विक्री सुरू होईल.

एचडीएफ आणि आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड्स वापरून फोन खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. याशिवाय फोनवर अन्य डाटा ऑफर देखील आहेत.

Image Credited -firstpost

अँड्राईड 10 वर काम करणाऱ्या व्हिवो व्ही19 स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचचा फूल एचडी+ सूपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Image Credited – moneycontrol

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात प्रायमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. तर इतर 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी यात ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून, यात 32 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये सुपर नाइट सेल्फी, सुपर वाइड अँगल सेल्फी आणि अल्ट्रा स्टेबल व्हिडीओ सारखे फीचर्स आहेत. तसेच फोनमध्ये 33W फ्लॅशचार्ज 2.0 सोबत 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment