व्हिडीओ : पहा हॉटेलमध्ये किती वेगाने पसरतो कोरोना

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहे. कोरोनापासून बचावासाठी वारंवार हात धुण्यास सांगितले जात आहे. विशेष काळजी न घेतल्यास हा व्हायरस किती वेगाने पसरू शकतो, हे दाखविण्यासाठी जापानच्या एका हॉटेलमध्ये प्रयोग करण्यात आला आहे. जर लोक एकत्र जमले तर व्हायरस किती वेगाने पसरू शकतो, हे व्हिडीओमधून दिसत आहे.

रेक्स चॅपमॅन या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने लिहिले की, जापानच्या एका हॉटेलमध्ये व्हायरस किती वेगाने पसरतो हे दाखविण्यासाठी प्रयोग करण्यात आला.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्तीच्या हातावर तरळ पदार्थ देण्यात आलेला आहे. काही वेळासाठी हा पदार्थ व्हायरस आहे असे समजू. यानंतर तो व्यक्ती हॉटेलमध्ये जेवतो, आपल्या मित्रांसोबत गप्पा मारतो. यानंतर हा व्हायरस इतरत्र कशाप्रकारे पसरतो हे दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment