या प्लॅनमध्ये आता 6 महिने मोफत पहा टाटा स्काय

टाटा स्कायने आपली Binge+ सेट-टॉप बॉक्स सेवा 3,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. सोबतच कंपनी बिंज+ सेट बॉक्ससोबत 6 महिन्यांसाठी सेवा मोफत देत आहे. टाटा स्काय बिंज सर्व्हिसद्वारे युजर्स ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म्स जसे की, डिज्नी+ हॉटस्टार, सन नेक्स्ट, हंगामा प्ले, शेमारू मी आणि एरॉस नाऊ सारखे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. सोबतच 3 महिन्यांसाठी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सेवा मोफत देण्यात येत आहे.

टाटा स्काय बिंज+ ची ही नवीन किंमत त्या ग्राहकांसाठी आहे ज्यांना आपला सेटटॉप बॉक्स बिंज+ ला अपग्रेड करायचा आहे. अँड्राईड क्षमता असणाऱ्या टाटा स्काय बिंज+ सोबत युजर्स एका डिव्हाईसवर लाईव्ह टिव्ही आणि ओटीटी पाहू शकतील. मागील 7 दिवसांचा टिव्हीवरील कॉन्टेंट देखील पाहता येईल. यात क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टेंट देखील देण्यात आलेले आहे. कंपनीने जानेवारीमध्ये बिंज+ सेट टॉप बॉक्स जानेवारीमध्ये लाँच केले होते. तेव्हा याची किंमत 5,999 रुपये होती.

दरम्यान, डिश टिव्ही, डीटूएच आणि एअरटेल डिजिटल टिव्ही देखील अँड्राईड टिव्ही सेट टॉप बॉक्स देत आहेत.

Leave a Comment