International Nurses Day : कोण होत्या ‘लेडी विद द लँप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्लोरेंस

जगभरात सुरू असलेल्या कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी आणि नर्सेसची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. दरवर्षी 12 मे ला आंतरराष्ट्रीय नर्स दिन पाळला जातो. यंदा 2020 हे आंतरराष्ट्रीय नर्स वर्ष म्हणून पाळले जात आहे. कारण 200 वर्षांपुर्वी 12 मे 1820 ला प्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आठवणीत हा दिवस पाळला जातो. प्लोरेंस यांना सैनिक लेडी विद लँप या नावाने बोलवत असे. पंतप्रधान मोदींनी देखील मन की बात कार्यक्रमात प्लोरेंस नाइटिंगेल यांचा उल्लेख केला होता.

12 मे 1820 ला इटलीच्या प्लोरेंसमध्ये जन्म झालेल्या प्लोरेंस नाइटिंगेल या इंग्लंडमध्ये मोठ्या झाल्या. श्रींमत कुटुंबात जन्मलेल्या प्लोरेंस यांना 16 व्या वर्षीच जाणीव झाली होती की त्यांचा जन्म सेवेसाठी झाला आहे. त्यांचे वडील विलियम प्लोरेंस या विरोधात होते, कारण त्यावेळी नर्स हा चांगला पेशा समजला जात नसे. अखेर 1851 ला त्यांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली व 1853 ला लंडनमध्ये महिलांसाठी हॉस्पिटल सुरू केले.

वर्ष 1954 मध्ये ब्रिटिश सैनिकांना रशियातील क्रिमिया येथे युद्धासाठी पाठवण्यात आले होते. युद्धात सैनिक जख्मी, मृत होण्याची माहिती येऊ लागल्यानंतर त्या तेथे नर्स घेऊन पोहचल्या. तेथे घाण, उपकरणांची कमतरता, बेड अशी कोणतीच सोय नव्हती. प्लोरेंस यांनी हॉस्पिटलची स्थिती सुधारण्यासोबतच रुग्णांसाठी अंघोळ, जेवण, जख्मेचे ड्रेसिंग इत्यांदीवर लक्ष दिले. त्यामुळे सैनिकांची स्थिती सुधारली.

युद्धाच्या काळात प्लोरेंस सैनिकांची विशेष काळजी घेत. त्यांच्यासाठी घरच्यांना पत्र लिहित. रात्रीच्या वेळी दिवा घेऊन त्या सैनिकांना पाहण्यास जात असे. याच कारणामुळे सैनिक आदर आणि प्रेमाने त्यांना ‘लेडी विद द लँप ‘म्हणत असे. वर्ष 1856 ला युद्धानंतर परतल्यावर त्यांचे हे नाव प्रसिद्ध झाले. फ्लोरेंस यांना राणी विक्टोरिया यांनी देखील पत्र लिहित धन्यवाद म्हटले होते. वर्ष 1856 मध्ये राणी विक्टोरियाशी भेट घेऊन त्यांनी आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यास सुरूवात केली.

लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये 1960 साली नाइटिंगेल ट्रेनिंग स्कूल फॉर नर्सेजची सुरूवात करण्यात आली. येथे नर्सेसना चांगले प्रशिक्षण देण्यात येत असे. 13 ऑगस्ट 1919 ला फ्लोरेंस यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ जन्मदिवशी आंतरराष्ट्रीय नर्स दिनाची सुरूवात करण्यात आली. या दिनानिमित्ताने या क्षेत्रात उत्तम कामगिरा करणाऱ्या नर्सेसचा प्लोरेंस नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान केला जातो.

Leave a Comment