अर्थव्यवस्था, कोरोनासंदर्भात पोम्पियो यांनी भारतासह 7 देशांशी साधला संवाद

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माइक पोम्पियो यांनी कोरोना व्हायरसचे संकट, जागतिक अर्थव्यवस्था इत्यादी विषयांवर व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून भारत, इस्त्रायल, दक्षिण कोरिया, जापान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला.

या कॉन्फ्रेंसमध्ये वस्तूंच्या पुरवठ्यावर असलेल्या चीनच्या वर्चस्वाबाबत चर्चा करण्यात आली. ट्रम्प प्रशासनाने चीनमधील कंपन्या इतरत्र हटवणार असल्याचे देखील सांगितले. याआधी पोम्पियो यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की, जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी अमेरिकन सरकार ऑस्ट्रेलिया, भारत, जापान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि व्हिएतनामसोबत काम करत आहे. आज झालेली व्हिडीओ कॉन्फ्रेंस हा यातीलच एक भाग होता. या कॉन्फ्रेंसमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, ऑस्ट्रेलियाचे मारिसे पायने, ब्राझालीचे अर्नेस्टो अराउजो, इस्त्रायलचे यीजराइल काट्ज, जापानचे तारो कोनो आणि दक्षिण कोरियाचे कांग क्युंग व्हा सहभागी झाले होते.

जयशकंर यांनी ट्विट करत सांगितले की, या कॉन्फ्रेंसमध्ये महामारी, जागतिक आरोग्य व्यवस्थापन, मेडिकल कॉऑपरेशन, प्रवासाचे नियम आणि अर्थव्यवस्था याविषयी चर्चा झाली.

अमेरिकेच्या मंत्रालयाने माहिती दिली की पॉम्पियो यांनी कॉन्फ्रेंसमध्ये कोरोना व्हायरसच्या लढ्यात आंतरराष्ट्रीय सहभाग, पारदर्शकता आणि जबाबदारी याविषयी चर्चा झाली.

Leave a Comment