या ट्विटवरून आयसीसीने शोएब अख्तरला केले ट्रोल

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एका ट्विटला उत्तर देताना म्हटले होते की, तो आजही केवळ चौथ्या बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथला आउट करू शकतो. आता यावरून आयसीसीने शोएब अख्तरला हटके पद्धतीने ट्रोल केले आहे.

इएसपीएन क्रिकएंफोने सध्याच्या क्रिकेटर्स आणि माजी क्रिकेटपटूंची जोडी बनवली होती. ज्यात एक फलंदाज आणि एक गोलंदाज समोरासमोर होते. यावर उत्तर देताना अख्तरने ट्विट केले होते की, आजही 3 खतरनाक बाउंसर आणि त्यानंतर चौथ्या बॉलवर स्टिव्ह स्मिथला आउट करू शकतो. यावर आयीसीने मजेशीर प्रतिक्रिया देत अख्तरला ट्रोल केले आहे.

आयसीसीने तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये मायकल जॉर्डन काहीतरी वाचताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये अख्तरचे ट्विट आहे आणि तिसऱ्या फोटोमध्ये अख्तरचे ट्विट वाचून जॉर्डनला देखील हसू आल्याचे दाखविण्यात आले आहे.

https://twitter.com/Smithed49/status/1260105003043188739

https://twitter.com/Smithed49/status/1259874676907573259

आयसीसीचे हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी शोएब अख्तरची बाजू घेतली. तर काहींनी अख्तरला बाँड्रीस मारतानाचे जुने व्हिडीओ शेअर केले.

Leave a Comment