कोरोना : या कॅब कंपनीने सोशल डिस्टेंसिंगची अनोखी लढवली शक्कल

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या व्हायरसपासून बचावासाठी विविध उपाय केले जात आहे. प्रवासात या व्हायरसची लागण होऊ नये यासाठी देखील खबरदारी घेतली आहे. आता केरळमधील एका खाजगी टॅक्सी कंपनीने कारचालक आणि प्रवाशांच्या सीटच्या मध्यभागी पारदर्शक विभाजक लावले आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, एर्नाकुलम जिल्ह्याच्या प्रशासनाकडून सुचना मिळाल्यानंतर हे केले.

कंपनीच्या कॅब्स परदेशातून विमान आणि जहाजांद्वारे येणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. चालक आणि प्रवाशांमध्ये सोशल डिस्टेंसिंगचे पालन व्हावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काही दिवसांपुर्वी पश्चिम बंगालमधील असाच एका ई-रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात सोशल डिस्टेंसिंगसाठी रिक्षाची वेगवेगळ्या भागात विभागणी करण्यात आली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्या रिक्षाचालकाला कंपनीत नोकरी देणार असल्याचे देखील म्हटले होते.

Leave a Comment