आता लोकप्रिय होतो आहे कोरोना हेअरस्टाइल ट्रेंड

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद करण्यात आहेत. न्हावीची दुकाने, सॅलून, ब्यूटी पार्लर देखील बंद असल्याने केस कापणे अवघड झाले आहे. मात्र दुसरीकडे पुर्व आफ्रिकेत कोरोना व्हायरस हेअरस्टाइल लोकप्रिय ठरत आहे.

Image credited – Amarujala

या हेअरस्टाइलमध्ये लोक कोरोना व्हायरसच्या आकाराप्रमाणे शेंडी बनवत आहेत. केनियात लहान मुलांमध्ये ही हेअरस्टाइल लोकप्रिय ठरत आहे. या हेअरस्टाइलच्या माध्यमातून लोकांना कोरोनाच्या बाबतीत जागृक केले जात आहे. विदेशी हेअरस्टाइलचे फोटो आफ्रिकेतील सॅलूनमध्ये लावलेले आहेत.

Image credited – Amarujala

केनियाची राजधानी नॅरोबी येथील 24 वर्षीय हेयरड्रेसर शेरोन रेफा लहान मुले आणि युवकांचे केस स्पाइक्सप्रमाणे डिझाईन करतात. याला कोरोना व्हायरस हेअरस्टाइल म्हटले जात आहे. मार्गरेट एंडेया म्हणाल्या की, ही हेयरस्टाइल फॅशनला अनुकूल तर आहेच. सोबतच महागड्या हेअरस्टाइलसाठी पैसे देखील खर्च होत नाहीत. ज्यांना महागडी हेअरस्टाइल परवडत नाही व स्टाइलिश हेयरस्टाइल हवी असते. त्यांच्यासाठी ही हेअरस्टाइल खूपच स्वस्त आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment