काही दिवसांपुर्वीच चीनी सैन्य आणि भारतीय सैन्य उत्तर सिक्कीममध्ये एकमेंकाशी भिडले होते. यामध्ये दोन्हीकडील जवान जख्मी झाले होते. त्यानंतर आता लद्दाखच्या लाईन ऑफ एक्च्युअल कंट्रोलवर (एलएसी) चीनचे हॅलिकॉप्टर्स उड्डाण घेताना दिसले. यानंतर भारतीय हवाई दलाने देखील लढाऊ विमानांना तेथे पेट्रोलिंगसाठी पाठवले. भारत आणि चीनचे सैन्य एकमेंकाना भिडले होते, जवळपास त्याच वेळी ही घटना घडली होती.
सीमेजवळ दिसले चीनी हॅलिकॉप्टर्स, हवाई दलाने लढाऊ विमाने केली तैनात
एएनआयच्या वृत्तानुसार, चीनचे हॅलिकॉप्टर एलएसीच्या खूप जवळून उडत होते. त्यांच्या विमानांच्या हालचालीबाबत माहिती मिळताच भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी त्या भागात गस्त घातली. चीनी हॅलिकॉप्टर भारतीय हद्दीत आले नाहीत.
भारतीय हवाई दलाचे सुखोई 30 एमकेआय लढाऊ विमाने आणि अन्य विमाने लद्दाखच्या लेह हवाई अड्डयावरून नेहमी उड्डाण घेतात. पाकिस्तानची लढाऊ विमाने एफ-16एस आणि जेएफ-17 ने देखील भारताच्या पुर्वी सीमा भागात गस्त घालणे वाढवले आहे. हंदवाडा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत पलटवार करेल या भीतीने पाकिस्तान असे करत आहे.