रेल्वेने प्रवाशांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप केले अनिवार्य

12 मे पासून देशातील काही भागांमध्ये 15 रेल्वे चालू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ऑनलाईन तिकिट खरेदी करून प्रवास करता येतो. 11 मे पासून ऑनलाईन तिकिट विक्री सुरू झाली असून, आता रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप अनिवार्य केले आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.

अमरउजालाच्या वृत्तानुसार, ज्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप नसेल, त्यांना स्टेशनवरच अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाईल व त्यानंतरच रेल्वेमध्ये प्रवेश दिला जाईल.

सध्या नवी दिल्ली स्टेशन ते डिब्रुगढ, आगरतला, होवराह, पाटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगलुरू, चेन्नई, तिरूअनंतपूरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या मार्गावर रेल्वे धावणार आहेत. या रेल्वेमध्ये केवळ एसी कोच असतील व भाडे राजधानी रेल्वे एवढे असेल. याशिवाय तिकीट रद्द केल्यास 50 टक्के रक्कम कापली जाईल.

Leave a Comment