या टॉपच्या क्रिकेट खेळाडूंनी बोल्ड होण्यात बनविलेय रेकॉर्ड


फोटो साभार झी
क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या, सर्वाधिक बळी कोणाचे, सर्वाधिक कॅच कोणाचे ही रेकॉर्ड्स सतत नोंदली जातात आणि त्याची महिती क्रिकेटप्रेमी आवर्जून लोकांना देत असतात. पण क्रिकेट मध्ये सर्वाधिक वेळा बोल्ड कोण झाले याची फारशी चर्चा होताना दिसत नाही. याचे एक कारण म्हणजे क्रिकेट मध्ये बोल्ड आउट होणे हे सर्वात वाईट मानले जाते आणि एखादा खेळाडू वारंवार याच पद्धतीने आउट होत असेल तर याच्या खेळाच्या तंत्रावरचा प्रश्न उपस्थित केले जातात. पण क्रिकेटच्या सर्व प्रकारात बोल्ड होण्याची रेकॉर्ड आहेत आणि त्याची माहिती ऐकली तर क्रिकेटप्रेमीना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.


फोटो साभार क्रिकेट काउंटी
तंत्रशुध्द खेळ आणि विकेटवर भक्कम पाय रोवण्याची कामगिरी यामुळे टीम इंडियामध्ये’ द वॉल’ अशी ओळख मिळविलेला राहुल द्रविडने सर्वाधिक वेळा बोल्ड होण्याचा कारनामा करून दाखविला आहे असे सांगितले तर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही. पण त्याने हे रेकॉर्ड केले आहे तेही कसोटी सामन्यात. त्याने खेळलेल्या १६४ टेस्ट मध्ये तो ५५ वेळा बोल्ड झाला आहे. पण त्याचबरोबर २८६ डाव खेळताना तो ३२ वेळा नॉटऔट सुद्धा राहिला आहे. वन डे मध्ये तो ५७ वेळा बोल्ड झाला आहे.


फोटो साभार पिंटरेस्ट
सर्वाधिक रन्स काढण्याचे रेकॉर्ड नावावर असलेला मास्टरब्लास्टर सचिन सुद्धा कसोटी सामन्यात ५४ वेळा बोल्ड होऊन या यादीत दोन नंबर वर आहे. तर वनडे मध्ये ६८ वेळा बोल्ड होऊन सचिन पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत तीन नंबरवर आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान अॅलन बॉर्डर. तो कसोटीत ५३ वेळा बोल्ड झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाचाच स्टीव्ह वॉ वन डे मध्ये ६३ वेळा बोल्ड झाला आहे.

टी २० मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक वेळा बोल्ड होणारा फलंदाज आहे श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान. ८७ सामन्यात तो १९ वेळा बोल्ड झाला आहे. वॉर्नर आता हे रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ पोहोचला असून तो आत्तापर्यंत १८ वेळा बोल्ड झाला आहे तर टीम इंडियाचा रोहित शर्मा त्याच्या मागेच असून तोही १५ वेळा बोल्ड झाला आहे.

Leave a Comment