मायक्रोसॉफ्ट टीमचे गुगल मीट आणि झूमला तगडे आव्हान


फोटो साभार झी न्यूज
गुगल मीट आणि चीनी झूम यांनी लॉकडाऊन काळात एकाचवेळी अनेकांना व्हिडीओ कॉलिंगची सुविधा दिली असली तरी त्यांना आता मायक्रोसॉफ्ट टीम कडून तगडे आव्हान मिळणार आहे. झूमचे नियंत्रण चीनी कंपनीकडे आहे आणि तेथे एकावेळी १० लोकांना व्हिडीओ कॉलिंग सुविधा मिळते तर गुगल मीट मध्ये ५० युजर एकाचवेळी ही सुविधा वापरू शकतात. मायक्रोसॉफ्ट टीम पुढच्या महिन्यात एक नवी सुविधा देत असून त्यामुळे एकचवेळी २५० लोक व्हिडीओ कॉलिंग सुविधा वापरू शकतील आणि त्यासाठी कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही असे समजते.

लॉकडाऊन मुळे घराबाहेर पडणे शक्य नाही आणि करोनामुळे एकमेकांची भेट अशक्य अश्या परिस्थितीत केवळ नागरिकच नाही तर अनेक कंपन्याही त्यांच्या ऑफिशियल भेटी आणि चर्चा यासाठी अनेक व्हिडीओ अॅपचा वापर करू लागल्या आहेत. झूमवर युजरच्या सुरक्षिततेची कोणतीही खात्री नाही असा इशारा केंद्र सरकारने पूर्वीच दिला आहे. अश्या परिस्थितीत मायक्रोसॉफ्ट टीम फारच उपयुक्त ठरणार आहे.

मायक्रोसॉफ्ट टीमचा दावा आहे, जगात त्यांचे ७.५ कोटी युजर्स असून ते आता या नव्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. नवीन प्रोजेक्ट मुळे कंपनी त्यांचा स्टाफ अथवा एखाद्या इव्हेंट बाबत चर्चा करायची असेल तर त्याचा ग्रुप चॅट सारखाही वापर करू शकतील. यावरून ग्रुप कॉल करता येतील आणि पेड प्लान मध्ये मिटींग शेड्यूल करता येतील. फोन कॉलचे रेकॉर्डिंग करता येईल आणि त्याला १ टीबी स्टोरेज असेल. सध्या या सुविधेवर एकावेळी २० लोक व्हिडीओ कॉलिंग करू शकतात, पण नवीन प्रोजेक्ट नंतर ही संख्या २५० वर जाणार आहे.

Leave a Comment