करोना उद्योगांसाठी मारकच पण यातूनच मिळणार नव्या संधी- रतन टाटा


फोटो साभार जागरण
जगभर पसरलेली कोविड १९ ची साथ उद्योगधंद्यासाठी मारक आहे यात वाद नाहीच पण येणाऱ्या भविष्यात ही साथ नव्या संधी देणारीही ठरेल असे प्रसिद्ध उद्योजक, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी सोमवारी त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल मिडिया पेजवर म्हटले आहे.

टाटा म्हणाले करोना महामारीमुळे उद्योग क्षेत्रात येणाऱ्या काळात नवीन बदल होतील यात शंका नाही. यापुढे उद्योग अधिक सक्षम करणे. त्या दृष्टीने आखणी करणे आणि नवीन शोध घेण्यासाठी प्रेरणा मिळेल. या काळात तश्या अनेक संधी लपल्या आहेत त्याचा शोध घ्यायला हवा. कोविड १९ च्या संकटामुळे उद्योगजगताला नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, त्याचा वापर करणे आवश्यक बनेल. कंपन्या अधिक चांगल्या प्रकारे संचालित केल्या जातील. अंत्रेप्रेन्यूअरनी वाईट काळात नेहमीच दूरदर्शीपणाचा परिचय करून दिला आहे. आम्ही मात्र अश्या गोष्टींसाठी तयार राहावे लागेल याचा विचार कधी केला नव्हता.

आजच्या घडीला नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक ठरते आहे करण आज त्याची गरज आहे. अंत्रेप्रेन्यूअरनी दूरदृष्टीने ज्या नव्या गोष्टी आत्मसात केल्या त्यालाच नवे तंत्रज्ञान म्हणून ओळख मिळाली आहे. अंत्रेप्रेन्यूअरनी लावलेले हेच नवे शोध भविष्यात बेंचमार्क ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

रतन टाटा यांनी १९९१ ते २८ डिसेंबर २०१२ पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

Leave a Comment