पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधून दिसत आहे हिमालय

लॉकडाऊनमुळे प्रदुषणाचे प्रमाण एवढे कमी झाले आहे की आता देशातील विविध शहरातून बर्फाच्छादित हिमालयाचा कडा दिसू लागला आहे. काही दिवसांपुर्वी बिहारमधून हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. आता उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून शेकडो किमी लांब असलेले हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा दिसत आहेत. मागील दोन आठवड्यात सहारनपूर येथून हिमालय दिसण्याची ही दुसरी वेळ आहे.

हे फोटो बालरोगतज्ञ डॉ. विवेक बॅनर्जी यांनी काढले असून, आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर व्हायरल झाले. रमेश पांडे यांनी फोटो शेअर करत लिहिले की, पुन्हा एकदा सहारनपूरमधून बर्फाच्छादित हिमालय दिसत आहे. वादळ आणि जोरदार पावसानंतर आकाश स्वच्छ झाले आहे.

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी देखील हे फोटो शेअर केले. फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment