आकाशात फुटले स्पेस रॉकेट, दुसऱ्या उपग्रहांना धोका

रशियाच्या अंतराळ संस्थेचे रॉकेटचा पुढील भाग अंतराळात फुटल्याचे माहिती समोर आली आहे. यातून निघणारा कचरा पृथ्वीच्या कक्षेत पसरला आहे. 8 मे ला हिंद महासागराच्या वरती रशियाच्या रॉकेट फुटले व त्याचे 65 तुकडे अंतराळातील सेटेलाईट्ससाठी धोका ठरत आहेत. हे तुकडे सेटेलाईट्सला नुकसान पोहचवू शकतात.

रशियन अंतराळ एजेंसी रॉसकॉसमॉसनुसार, रशियाच्या या रॉकेटचे नाव फ्रीगेट-एसबी (Fregate-SB) असून, या रॉकेटद्वारे 2011 मध्ये सेटेलाईट स्पेक्टर-आरला स्थापित करण्यात आले होते. हे रशियाचे हेरगिरी करणारे सेटेलाईट आहे. मागील वर्षी या सेटेलाईटला बंद करण्यात आले होते. रॉकेटचा किती भाग तुटला आहे, याची माहिती रशियन एजेंसी घेत आहे.

अमेरिकेच्या यूएस18 स्पेस कंट्रोल क्वाड्रनने म्हटले आहे की, रॉकेटचे 65 तुकडे दिसले असून, पृथ्वीच्या वरती फिरणाऱ्या सेटेलाईट्सला धोका ठरू शकतात. या तुकड्यांची गती व दिशेला ट्रॅक केले जात आहे. सेटेलाईट्सला धोका असल्यास त्याची दिशा बदलण्यात येईल.

Leave a Comment