हा 1 वर्षीय चिमुकला शेफ आहे सोशल मीडिया स्टार

सोशल मीडियाद्वारे आज अनेकजण एका रात्रीत स्टार झालेले आहेत. अनेक लहान मुले देखील सोशल मीडिया सेंसेशन आहेत. सध्या असेच एक बाळ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या बाळाचे जेवण बनवितानाचे व्हिडीओ शेअर करण्यासाठी पालकांनी इंस्टाग्राम अकाउंट सुरू केले असून, त्याचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवर हे अकाउंट ‘कोबे इट्स’ या नावाने असून, 1 वर्षीय कोबेचे पालक एश्ले आणि कायल हे दोघे हे अकाउंट सांभाळतात. 25 फेब्रुवारी 2020 रोजी या अकाउंटद्वारे कोबेचा पहिला व्हिडीओ टाकला होता. त्यानंतर आतापर्यंत काही महिन्यातच तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

कोबेच्या प्रत्येक व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेट्स येतात. आपल्या आईची थोडीफार मदत घेत कोबे अगदी आनंदात जेवण बनवत असतो. केकपासून ते चिकनपर्यंत असे अनेक पदार्थ कोबे बनविण्याचा प्रयत्न करतो. त्याचा क्यूटनेस, जेवण बनवतानाचे हास्य युजर्सला देखील भलतेच आवडते. त्याचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो.

Leave a Comment