सायकलने 1000 किमीचा प्रवास करून घरी जाताना जेवण करणे बेतले मजूराच्या जीवावर, कारने उडवले, अपघातात मृत्यू

दिल्लीवरून सायकलने 1000 किमी अंतर पार करत बिहारमधील पश्चिम चंपारण येथील आपल्या घरी जाणाऱ्या एका मजूराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कारने धडक दिल्याने मजूराचा मृत्यू झाला असून, त्याच्या पाठीमागे बायको आणि तीन मुले आहेत.

26 वर्षीय सघीर अंसारीने 5 मेला आपल्या 7 मित्रांसह लॉकडाऊनमुळे काम मिळत नसल्याने दिल्लीवरून आपल्या घरचा प्रवास सुरू केला होता. हे अंतर पार करण्यासाठी त्यांना 5 दिवस लागले. आपल्या प्रवासात हे मजूर रोडच्या डिव्हाईडरवर बसून नाश्ता करत होते. याच दरम्यान एका कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अंसारी यांना धडक दिली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडामुळे इतरांचे प्राण वाचले.

त्याच्यासोबतच इतर मजूरांनी सांगितले की, कारचालकाने आधी त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला व नंतर नकार दिला. इतरांनी अंसारी यांनी हॉस्पिटलमध्ये नेले असता, तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही एनजीओ आणि कार्यकर्त्यांनी पैसे जमा करून रुग्णवाहिकेद्वारे त्यांचे शव घरी पाठवले. कारचालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment