इरफानच्या प्रेमापोटी महाराष्ट्रातील या गावकऱ्यांनी गावाला दिले ‘हे’ नाव

बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या अभिनेत्याच्या प्रेमापोटी आता राज्यातील इगतपूरी गावातील गावकऱ्यांनी त्याच्या नावावरून जागेचे नाव ठेवले आहे.

इरफान खानचे गावकऱ्यांशी अगदी जिव्हाळ्याचे नाते होते व तो गावातील गरीब कुटुंबाची नेहमीच मदत करते. इरफानने गावातच जागा खरेदी केली होती. तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये एक नाते तयार झाले होते व गावाच्या विकासात इरफानने नेहमीच मदत केली.  इरफान त्या भागात राहणाऱ्या मुलांसाठी पुस्तके, रेनकोट्स, स्वेटर्स आणि इतर आवश्यक वस्तू देखील देत असे. तो या गावकऱ्यांसोबत सण साजरा करत व त्यांना मिठाई देखील पाठवायचा.

इरफानच्या निधनानंतर अखेर त त्याच्या सन्मानार्थ गावकऱ्यांनी त्याचे घर असलेल्या जागेला हिरोची वाडी असे नाव देण्याचे ठरवले आहे.

Leave a Comment