काऊंटी क्रिकेटच्या भानगडीत जसप्रीत बुमराहने न पडलेलेच बरे


अल्पवधीत भारतीय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारतीय संघाचा हा वेगवान गोलंदाज त्याच्या गोलंदाजीची खास शैली, भन्नाट यॉर्कर यामुळे ओळखला जातो. त्याने टाकलेला चेंडू अनेक फलंदाजांना समजतच नाही. त्याला भारतीय संघात स्थान मिळाल्यापासून त्याने अल्पवधीतच संघाचा प्रमुख गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. त्यातच आता बुमराहला पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वासिम अक्रमने एक मोलाचा सल्ला दिला आहे. भविष्यात बुमराहने काऊंटी क्रिकेट खेळण्याच्या भानगडीत पडू नये, असे अक्रमने म्हटल आहे.

भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राच्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना वासिम अक्रम म्हणाला की, क्रिकेटचा गेल्या काही वर्षांत अतिरेक झाला आहे. त्याचबरोबर या दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये जसप्रीत बुमराह सारख्या गोलंदाजाने आश्वासक कामगिरी केली आहे. भारताचा तो सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याची कामगिरी पाहता मी त्याला काऊंटी क्रिकेट न खेळण्याचा सल्ला देईन. त्यात सध्या तिन्ही प्रकाराचं क्रिकेट बुमराह खेळत असल्यामुळे त्याने काऊंटी क्रिकेटच्या भानगडीत पडू नये. बुमराहसारख्या तरुण गोलंदाजांनी अधिकाधिक स्थानिक क्रिकेट खेळले पाहिजे. येथूनच त्यांच्या गोलंदाजीत सुधारणा होऊ शकते.

Leave a Comment