अशी झाली होती स्माइली इमोजीची सुरूवात

आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामपासून ते व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करण्यासाठी स्माइली इमोजीचा वापर केला जातो. भावना व्यक्त करण्यासाठी युजर्स या इमोजीचा सर्रास वापर करतात. मात्र या इमोजींची सुरूवात कशी झाली होती माहिती आहे ? याविषयी जाणून घेऊया.

वर्ष 1963 मध्ये एका विमा कंपनीने आपल्या नाराज कंपन्यांना खूष करण्यासाठी पब्लिक रिलेशन कंपनी चालवणाऱ्या हार्वी रास बॉल यांच्याशी संपर्क केला. तेव्हा कंपनीने हार्वी यांनी सांगितले की आम्ही दुसऱ्या कंपनीशी विलिनीकरण केल्याने कर्मचारी नाराज आहे. यावेळी हार्वी यांनी पिवळ्या रंगाचा एक हसणारा चेहरा बनवला. हे पाहून सर्वच कर्मचारी खूष झाले. तेव्हापासून आतापर्यंत याला स्माइली या नावाने ओळखले जाते. हार्वी यांना या स्माइलीला बनविण्यासाठी 45 डॉलर घेतले होते.

स्माइली इमोजी त्यानंतर खूपच लोकप्रिय झाली. 1971 मध्ये तर तब्बल 5 कोटी स्माइली फेस बटन विकले गेले होते. 1999 मध्ये यूएल टपाल खात्याने देखील स्माइली फेसचे स्टँप जारी केले होते. 19 सप्टेंबर 1982 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या कानर्गी मिलॉन यूनिव्हर्सिटीचे प्रा. स्कॉट ई फालमॅन यांनी कॉम्प्युटरमध्ये  स्माइलीचा उपयोग केला. त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये स्माइलीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला.

Leave a Comment