मोबाईल, लॅपटॉप सॅनिटायझ करण्यासाठी डीआरडीओने बनविले खास डिव्हाईस

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. आता डीआरडीओची लॅब रिसर्च ऑटोमेटेड कॉन्टॅक्टलेसने (आरसीआय) एक यूव्हीसी सॅनिटायझिंग कॅबिनेट डिफेंस रिसर्च अल्ट्रावॉइलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस) तयार केले आहे. या डिव्हाईसद्वारे मोबाईल फोन, आयपॅड आणि लॅपटॉपसह अनेक गोष्टी सॅनिटायझ करता येतील.

डीआरडीओने सांगितले की, डीआरयूव्हीएसचा वापर करण्यासाठी याला स्पर्श करण्याची गरज नाही. या डिव्हाईसमध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर स्विच देण्यात आलेले आहे. जे ड्रॉवर ओपनिंग आणि क्लोजिंग मॅकेनिज्मवर काम करते.

डीआरयूव्हीएसचे वैशिष्ट्य म्हणजे यात ठेवण्यात आलेल्या वस्तूला यूव्हीसीचे 360 डिग्री एक्स्पोजर मिळते. सॅनिटायझेशन प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सिस्टम स्लीप मोडमध्ये जाते. त्यामुळे डिव्हाईस ऑपरेट करणाऱ्या व्यक्तीला तेथेच थांबण्याची गरज नाही.

या व्यतिरिक्त आरसीआयने ऑटोमॅटिक यूव्हीसी करेंसी सॅनिटायझेशन डिव्हाईस NOTESCLEAN देखील तयार केला आहे. यात नोटांच्या बंडलला डीआरयूव्हीएसच्या मदतीने सॅनिटायझ करता येते.

Leave a Comment