पुढील 2 वर्ष कोरोना राहण्याची शक्यता, संशोधकांचा दावा

जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरस पुढील 18 ते 24 महिने कायम राहण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेच्या संशोधकांनी म्हटले आहे. हा आजार वेळोवेळी डोके वर काढू शकतो, त्यामुळे या स्थितीस तयार राहावे असे जगभरातील सरकारला आवाहन केले आहे. अमेरिकेच्या मिनेसोटा यूनिव्हर्सिटीमध्ये सेंटर फॉर इंफेक्शियस डिजीज रिसर्ज अँड पॉलिसीकडून ‘कोव्हिड-19 व्ह्यूपॉइंट’ नावाने हे संशोधन करण्यात आलेले आहे. हे संशोधन डॉ. क्रिस्टीन ए. मूर (वैद्यकीय संचालक सीआयडीआरपी), डॉ. मार्क लिपिसच (संचालक, सेंटर फॉर कम्युनिकेबल डिजीज डायनामिक्स, हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ), जॉन एम बॅरी (प्रोफेसर, तुलाने यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ) आणि माइकल टी ओस्टरहोम (डायरेक्टर, CIDRAP) यांनी केले आहे.

यात 1700 पासून जगभरातील 8 इंफ्लूएंजा महामारींचा अभ्यास करण्यात आला आहे. यातील 1900 च्या दशकानंतर 1900-1919, 1957, 1968 आणि 2009-10 मध्ये आल्या आहेत. संशोधकांचा दावा आहे की, सार्स आणि मार्स पेक्षा सार्स-कोव्ह-2 वेगळा आहे. अभ्यासानुसार, इंन्फ्लूएंजा व्हायरस आणि कोव्हिड-19 व्हायरसमध्ये अंतर असले तरी साम्य देखील आहे. दोन्ही श्वसनाच्या नळीपासून पसरतात. दोन्ही लाखो लोकांना संक्रमित करण्यास आणि जगभरात वेगाने पसरण्यास सक्षम आहेत.

मागील महामारीच्या आधारावर वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरससाठी तीन संभावित परिस्थितीचा अंदाज लावला आहे. कोरोना व्हायरसचा इंक्यूबेशन पीरियड इंफ्लूएंजाच्या तुलनेत अधिक आहे. कोरोन व्हायरसची मूलभूत पुनरुत्पादन प्रमाण इंफ्लूएंजाच्या तुलनेत देखील जास्त आहे. मागील साथीच्या काळात हिवाळा किंवा उन्हाळ्यासारख्या हवामानाचा फारसा परिणाम झाला नाही.

संशोधकांचा पहिला अंदाज आहे की, उन्हाळ्यामध्ये कोरोनाची लाट येईल. असेच 1-2 वर्ष सुरू राहील. ही लाट स्थानिक स्थिती, प्रसार रोखण्यासाठी उचलेली पावले याच्यावर निर्भर आहे. दुसऱ्या अंदाजानुसार, 2020 च्या हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येऊ शकते. या दरम्यान प्रसार रोखण्यासाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे. हे 1918-19, 1957-58 आणि 2009-10 महामारीच्या समान आहे. तिसऱ्या अंदाजानुसार, 2020 च्या वसंतनंतर संक्रमणाचे प्रमाण हळूहळू कमी होईल.

संशोधकांचे म्हणणे आहे की, दुसऱ्या अंदाजानुसार योजना तयार ठेवावी. ही सर्वात खराब स्थिती आहे. सोबतच हे मान्य करावे की, यावर सध्या कोणतीही लस नाही. महामारी लवकर समाप्त होणार नाही हे लक्षात घेऊन सरकारने योजना बनवावी.

Leave a Comment