डब्ल्यूएचओने खाण्या-पिण्यासंबंधी जारी केली मार्गदर्शक तत्वे

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसबाबत आतापर्यंत अनेकदा मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. आताच याच क्रमात संघटनेने पहिल्यांदाच खाण्या-पिण्याविषयी दिशानिर्देश जारी केले आहेत.

Image Credited – Aajtak

स्वच्छतेची विशेष काळजी –

जेवण बनविण्याच्या कोणत्या ही वस्तूला हात लावण्याआधी हात स्वच्छ करावेत. शौचालयानंतर हात धुवावे व जेवण बनविण्याच्या जागेला धुवून सॅनिटायझ करावे. किटक-किडे यांना किचनपासून लांब ठेवावे. घाण जागा, पाणी व प्राण्यांमध्ये हे धोकादायक सुक्ष्मजीव आढळतात. हे सुक्ष्मजीव भांडी, किचन व कपड्यांद्वारे सर्वत्र पसरतात.

Image Credited – Aajtak

कच्चे व शिजलेले जेवण वेगवेगळे ठेवावे –

कच्चे मटन, चिकन अथवा मासे अन्य खाद्य पदार्थांपासून दूर ठेवावेत. कच्चा पदार्थांसाठी वापरण्यात आलेली भांडी, अन्य गोष्टींसाठी वापरू नये. कच्चा पदार्थांमध्ये धोकादायक सुक्ष्मजीव असतात. जेवण बनवताना हे एकातून दुसऱ्या पदार्थात जाऊ शकतात. त्यामुळे कच्चे व शिजलेले पदार्थ वेगवेगळे ठेवावे.

Image Credited – Aajtak

जेवण चांगले शिजवावे –

मांस, अंडी, कुक्कुटपालन आणि समुद्री पदार्थ चांगले शिजवावे. त्यांना 70 डिग्री सेल्सिअसमध्ये उकळून चांगले शिजवा. त्यांचा सूप बनवताना खात्री करुन घ्या की ते गुलाबी दिसत तर नाही ना. ते शिजवल्यानंतर स्वच्छ दिसायला हवे. आपण तापमान तपासण्यासाठी थर्मामीटर देखील वापरू शकता. शिजवलेले पदार्थ खाण्यापूर्वी पुन्हा एकदा गरम करावे. जेवण चांगले शिवजवल्याने सर्व किटाणू नष्ट होतात.

Image Credited – Aajtak

जेवण सुरक्षित तापमानात ठेवा-

शिजवलेल्या जेवणाला योग्य तापमानात फ्रिजमध्ये ठेवावे. तसेच जेवणाआधी 60 डिग्री सेल्सियस तापमानात गरम करावे. जेवणाला जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेऊ नये.

Image Credited – Aajtak

स्वच्छ पाण्याचा वापर –

पिण्यासाठी व जेवण बनविण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. शक्य असल्यास पाणी उकळून घ्यावे. भाजी-फळांना स्वच्छ धुवा. सुरक्षेच्या दृष्टीने पाश्चराइज्ड दुध चांगले आहे. वैधता संपलेले पदार्थ खाऊ नये. पाणी आणि बर्फात देखील अनेकदा धोकादायक सुक्ष्मजीव आढळतात, जे पाण्याला विषारी बनवतात. त्यामुळे पाणी उकळून घ्यावे.

Leave a Comment