विमानसेवा लवकरच सुरू होणार, जाणून घ्या काय बदलेल

रेल्वेनंतर आता लवकरच इंडियन एअरलाईन्स आपल्या सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. 17 मे ला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा पुर्ण होणार आहे. यानंतर काही प्लाईट्स सुरू होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सीएनएन-न्यूज18 ने वृत्त दिले आहे.

रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसमुळे नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. आता कमी अंतरावरील प्रवासासाठी क्रू मेंबर्स प्रवाशांना जेवण देणार नाही. याशिवाय प्रत्येक प्रवाशाला मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करावा लागेल.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ब्यूरो आणि सिव्हिल एव्हिशएनचे डायरेक्टर जनरल प्रमुख विमानतळाचा दौरा करतील. या दरम्यान व्यावसायिक प्लाइट्सच्या उड्डाणाविषयी अंतिम तयारीचा आढावा घेतील. पहिल्या टप्प्यात 25 टक्के क्षेत्र कव्हर केले जाईल.

दोन तासांच्या प्रवासासाठी जेवण दिले जाणार नाही. याशिवाय प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे आवश्यक असून, असे न केल्यास विमानात प्रवेश मिळणार नाही.

Leave a Comment