राज्यांनी पॅरामेडिकल स्टाफसह खाजगी क्लिनिकला द्यावी परवानगी – केंद्र

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. सरकारने म्हटले आहे की, प्रवासावरील निर्बंधांमध्ये कोव्हिड-19 च्या वैद्यकीय सेवांवर परिणाम होऊ शकतो.

अजय भल्ला यांनी पत्रात म्हटले आहे की, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रवासावर कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची योग्यरित्या प्रवास जनआरोग्य सेवा आणि मानवी आयुष्यासाठी महत्त्वाचा आहे.

याशिवाय भल्ला म्हणाले की, स्थानिक खाजगी क्लिनिक आणि नर्सिंग होम चालू होणे आवश्यक आहे. जेणेकरून हॉस्पिटलचे ओझे कमी होईल. क्लिनिक आणि नर्सिंग होम विना अडथळा सुरू ठेवण्याचे त्यांनी राज्यांना आवाहन केले आहे.

Leave a Comment