बॉयज लॉकर रुम प्रकरणाला वेगळे वळण, ‘सिद्धार्थ’ निघाली एक मुलगी, बनविले फेक अकाउंट

बॉयज लॉकर रुम प्रकरणाची तपासणी करताना सायबर सेलसमोर आता वेगळीच माहिती समोर आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, एका मुलीनेच सिद्धार्थ नावाने फेक प्रोफाईल बनवत स्नॅपचॅटवर मुलांसोबत चॅट केले होते. मुलांचे मन जाणून घेण्यासाठी तिने गँगरेपचा उल्लेख केला होता. हा संवाद इंस्टाग्राम नाही तर स्नॅपचॅटवर झाला होता. सायबर सेलने या प्रकरणात एका अल्पवयीनसह दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांनुसार, सिद्धार्थ नावाच्या एका मुलीने एका मुलाला गँगरेपच्या प्लॅनिंग सांगितली. ज्या मुलाला मेसेज पाठवण्यात आले, तो देखील अल्पवयीन आहे. त्याने त्या प्लॅनिंगमध्ये सहभागी होण्यास नकार देत, बोलणे बंद केले व चॅटचे स्क्रीनशॉट आपल्या मित्रांच्या ग्रुपवर पाठवले. त्या ग्रुपमध्ये ती मुलगी देखील होती. मित्रांपैकी एकाने स्क्रीनशॉट इंस्टाग्राम स्टोरी म्हणून पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

जेव्हा बॉयज लॉकर रुमबाबत दुसऱ्यांना माहिती मिळाली. त्यावेळी स्नॅपचॅटवरील बोलणे यात मिसळले गेले. अनेकांना हा संवाद इंस्टाग्रामवरील आहे, असे वाटले. सध्या सायबर सेल तीन इंस्टाग्राम अकाउंट्सची माहिती मिळवत आहेत.

डीसीपी अन्येश रॉय यांच्यानुसार, आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित 24 जणांची चौकशी केली आहे. सर्व डिव्हाईस जप्त करून फॉरेंसिंक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment