शोएब अख्तरला भारतात सेटल होण्याची इच्छा


पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने हॅलो अॅपवर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला भारतात सेटल होण्याची इच्छा असल्याचे सांगितले. शोएबच्या म्हणण्यानुसार तो कधीकाळी अब्जाधीश बनला तर त्याला मुंबईत सेटल होणे आवडेल. शोएबने या वेळी तो भारतातून जितकी कमाई करतो त्याच्या ३० टक्के भारतातच डोनेशन देतो असेही सांगितले.

हॅलो अॅपच्या व्हिडीओ सेशन मध्ये शोएब बोलत होता. यावेळी तो म्हणाला काश्मीर मध्ये २००५ साली भूकंप झाला होता तेव्हाही त्याने अनेक भारतीयांना सपोर्ट केले होते तसेच पाकिस्तान मध्येही तो नेहमीच हिंदू समाजाची मदत करतो. तो म्हणाला प्रत्येक व्यक्तीबद्दल मला प्रेम वाटते, मग ती व्यक्ती कोणत्याची धर्माची असो. शोएब स्वभावाने वास्तविक मृदू आहे पण बाहेर त्याची इमेज गंभीर व आक्रमक अशीच आहे.

शोएबने यावेळी चाहत्यांवर कसे प्रेम करायचे हे तो शाहरुख खान कडून शिकल्याचे सांगितले. शोएब म्हणाला, शाहरुख त्याच्या प्रत्येक चाहत्याची असे वागतो जणू त्यांची वर्षानुवर्षे ओळख आहे. शाहरुख शोएबला मोठ्या भावासारखा आहे. शोएब शाहरुखची मालकी असलेल्या आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलाही आहे. टीम इंडियाचा बोलिंग कोच व्हायची त्याची इच्छा त्याने यापृवीच बोलून दाखविली आहे.

Leave a Comment