पिझा डिलीव्हरीपेक्षा कमी वेळात घरी येईल महिन्द्राची कार


फोटो साभार युट्यूब
लॉकडाऊन सुरु असला तरी उद्योगव्यवसायांना दिलेल्या काही सवलती आणि नियम पाळून अनेक कारखाने सुरु झाले आहेत. लॉक डाऊन मुळे नागरिक अजून घराबाहेर पडू शकत नाहीत हे लक्षात घेऊन महिंद्र अँड महिंद्रने त्यांच्या वाहन खरेदीसाठी ‘ओन ऑनलाइन’ या नावाने ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरु केल्याचे महिंद्र ऑटो डिव्हिजनचे सीईओ विजय नाकरा यांनी सांगितले. ते म्हणाले ग्राहकाने पिझा ऑर्डर केल्यावर डिलीव्हरी साठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात ग्राहक महिंद्रची वाहने खरेदी करू शकणार आहेत.

यासाठी ग्राहकाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. या सेवेसाठी कंपनीने २७० हून अधिक डीलर्स आणि ९०० हून अधिक संपर्क केंद्रे जोडली आहेत. ग्राहकाला घरी टेस्ट ड्राईव, वाहन डिलीव्हरी सुविधा या अंतर्गत दिली जाणार आहे. केवळ चार स्टेप फॉलो करून ग्राहक ऑनलाईन एक्स्चेंज, फायनान्स, इन्शुरन्स सुविधेसह आवडीचे वाहन पसंत करू शकेल. वाहन पसंती, कोटेशन घेणे, विमा पर्याय आणि कुठेही संपर्क न करता पेमेंट अशी सुविधा दिली जाणार आहे.

मारुती सुझुकीनेही त्यांची देशातील ६०० शो रुम्स सुरु केली असून ५५ कार्सची डिलीव्हरी दिली आहे. त्यानीही वेबसाईटवर कार बुकिंग सुविधा दिली असून जरुरी कागदपत्रे तेथेच जमा करता येणार आहेत. त्यानंतर जवळच्या डीलरकडून कारची ग्राहकाच्या घरी डिलीव्हरी दिली जाणार आहे. त्या अगोदर कार सॅनीटाइज करण्याची खबरदारीही घेतली जाणार आहे.

Leave a Comment