धोनीची ‘डॅडी बिअर्ड’ सोशल मीडियावर चर्चेत


फोटो साभार खासखबर
टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याचे काही दिवसांनंतर त्याच्या चाहत्यांना पुन्हा दर्शन झाले असून त्याच्या दर्शनाने चाहते एकदम आश्चर्यचकित झाले आहेत. कारण यापूर्वी त्यांनी माही ला या अवतारात कधीच पाहिलेले नाही. धोनी कन्या जीवा हिच्या इन्स्टाग्राम अकौंटवर तिचा रनिंग करतानाचा एक व्हिडीओ शुक्रवारी शेअर केला गेला आहे. धोनीच्या रांची येथील फार्म हाउस वरील या व्हिडीओ मध्ये माहीचे दर्शन सेकंडभरच झाले आहे पण त्यात त्याची वाढलेली पांढरी दाढी म्हणजे ‘डॅडी बिअर्ड’ त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का देऊन गेली आहे.

धोनीच्या या दर्शनावर अनेक मिम्स आणि पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यात काहींनी आमचा आवडता खेळाडू म्हातारा झाला असे लिहिले आहे. क्रिकेट पंडित अयाज मेमन यांनी धोनीचा हा फोटो म्हणजे फोटोशॉपची कमाल नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. धोनी केवळ ३८ वर्षाचा आहे. यापूर्वी कधी कधी त्यांच्या दाढीचे काही केस पांढरे झाल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत पण त्यात धोनीने इतकी दाढी वाढविलेली कधीच दिसलेले नाही. लॉक डाऊन मुळे कदाचित धोनीवर ही वेळ आली असेल असेही म्हटले जात आहे.

एका तरुणीने मात्र धोनीची दाढी कितीही पांढरी दिसली तरी तो आजही अनेक तरुणींच्या हृदयाची धडकन आहे असे पोस्ट केले आहे. गेल्या वर्षी इंग्लंड मध्ये वनडे वर्ल्ड कप मध्ये धोनी खेळला होता त्यानंतर तो मैदानावर आलेला नाही. आयपीएल मध्ये तो चेन्नई कडून खेळणार होता पण करोना मुळे आयपीएल चे भवितव्य अजून तरी अंधारात आहे.

Leave a Comment