चीनने डब्ल्यूएचओला फोन करून कोरोनाची माहिती दाबली, रिपोर्टमध्ये दावा

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यातच असताना चीनने या संदर्भात जगाला माहिती न दिल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. आता जर्मनीचे न्यूज मॅग्झिन डेर स्पिईगलने देशाची फेडरल इंटेलिजेंस सर्व्हिसद्वारे (बीएनडी) मिळालेल्या माहितीच्या आधारावर दावा केला आहे की, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी स्वतः जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रोस एडहॅनम घेब्रियेसूस यांना कोरोना व्हायरसबाबत जागतिक चेतावणी जारी करण्यास विलंब करावा असे म्हटले होते.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, शी जिनपिंग आणि टेड्रोस यांच्यामध्ये जानेवारी महिन्यात चर्चा झाली होती. 21 जानेवारीला जिनपिंग यांनी टेड्रोस यांना सांगितले होते की, या संक्रमणाची माहिती थांबवावी व याबाबत चेतावणी देण्यास उशीर करावा.

या आरोपांवर जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर देत हे आरोप निराधार आणि असत्य असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने स्पष्ट केले की, दोघांमध्ये फोनवर कोणतीच चर्चा झाली नव्हती. असे रिपोर्ट कोरोना नष्ट करण्यासाठी काम करणारे संघटन आणि जगाचे लक्ष विचलित करते.

तसेच चीनने कोरोना व्हायरसचे संक्रमण मनुष्यातून मनुष्याला होत असल्याचे 20 जानेवारीला स्पष्ट केले होते व डब्ल्यूएचओने याबाबत 22 जानेवारीला माहिती दिली होती, असेही संघटनेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment