उत्तराखंडमधील जगातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचे फोटो व्हायरल

उत्तराखंडमधील मुनस्यारी येथील ट्यूलिप गार्डनचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हे फोटो उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. पिथोडगढ जिल्ह्यातील हे ट्यूलिप गार्डन 50 हेक्टरमध्ये पसरलेले आहे.

मुख्यमंत्री रावत यांनी फोटो शेअर करत लिहिले की, आपला ड्रीम प्रोजेक्ट मुनस्यारी येथील ट्यूलिप गार्डनचे पहिले फोटो शेअर करताना खूप आनंदी आहे. हे जगातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डन पैकी एक आहे व यामुळे मुनस्यारी भागातील पर्यटनाला चालना मिळेल.

मुनस्यारी 7000 हजार फूट उंचीवर असून, ट्यूलिपसाठी येथील हवामान चांगले आहे. हे गार्डन बर्फाच्छादित पंचाचूली पर्वतरांगाच्या येथे आहे.

मुख्यमंत्री रावत यांनी शेअर केलेले ट्यूलिप गार्डनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांना देखील हे फोटो खूपच आवडले. अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment