एलॉन मस्ककडून प्रेरणा घेत एसबीआयने ग्राहकांना दिली हटके पासवर्ड ठेवण्याची सुचना

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे काही दिवसांपुर्वी आपल्या बाळाचे नाव X Æ A-12 विशेष चर्चा होते. सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांनी या नावाने गोंधळात टाकले होते. मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) देखील या हटके नावापासून प्रेरणा घेतल्याचे दिसत आहे.

एसबीआयने आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड अधिक सुरक्षित ठेवण्यासंदर्भात ट्विट केले की, आम्हाला पासवर्ड हा स्ट्राँग आणि बाळाचे नाव हटके असलेले आवडते. सोबतच बँकेने एलॉन मस्क यांच्या बाळाचे नाव पासवर्ड म्हणून ठेवलेले दाखवले आहे. एसबीआयने लिहिले की, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड हा वेगळा ठेवा, सोबतच कुटुंबातील सदस्याच्या नावावरून ठेऊ नका, असा सल्ला देखील दिला. कुटुंबातील सदस्याच्या नावावरून पासवर्ड ठेवल्याने सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

दरम्यान, एलॉन मस्क यांनी हे हटके नाव त्यांची गर्लफ्रेंड ग्रिम्सने ठेवल्याचे सांगितले. सोबत X Æ A-12 नावाचा अर्थ देखील सांगितला. एक्सचा उच्चार हा एक्सच आहे. तर Æ  या अक्षराचा उच्चार ‘ash’ असा आहे आणि A-12 हे अक्षर 1960 च्या दशकात सीआयएसाठी हेरगिरी करण्यासाठी बनविण्यात आलेले विमान Archangel 12 वरून घेण्यात आलेले आहे.

Leave a Comment