रॉयल एनफिल्डच्या ‘इंटरसेप्टर 650’ बाईकच्या नव्या लूकची इंटरनेटवर ‘हवा’

रॉयल एनफील्डच्या मोटारसायकल बाइकर्समध्ये विशेष लोकप्रिय आहे. सोबतच या बाईक्सला मॉडिफाय करण्याचा देखील ट्रेंड आहे. देशभरात असे अनेक स्टार्टअप सुरू झाले आहेत, जे बाईक्सला हवे तसे मॉडिफाय करून देतात. अशाच एका दिल्लीतील नीव मोटारसायकलने इंटरसेप्टर 650 ची कस्टम बाईक तयार केली आहे. या बाईकचे नाव तामराज ठेवण्यात आले आहे.

तामराजमध्ये पुर्णपणे नवीन पेंट स्कीम देण्यात आली आहे. यात हाताने बनविण्यात आलेल्या बॉडी पार्ट्ससह आफ्टरमार्केट एक्सेसरीजचा देखील वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे बाईकला बोल्ड आणि शानदार बॉबर लूक मिळतो.

Image Credited – Amarujala

तामराजच्या काही कस्टम मेड बॉडी पार्ट्समध्ये टँक टॉप कव्हर, लहान फेंडर, फ्रंट सस्पेंशन कव्हर, बेली पॅन आणि लेदर सीटचा समावेश आहे. फ्रंटला ओरिजनल हेडलाइटला एका स्लिमर सर्क्युलर एलईडी हेडलाईट सेटअपसोबत बदलण्यात आलेले आहे. हँडल-बार एक आफ्टरमार्केट यूनिट आहे आणि फ्रंट सस्पेंशन फोकर्सला फॉर्क गॅटरसोबत कस्टमाइज्ड कव्हर देण्यात आले आहे. यात सिंगल सीट देण्यात आले आहे.

Image Credited – Amarujala

या मॉडिफाइड इंटरसेप्टर 650 मधील सर्वात मोठा बदल म्हणजे याचा 5-इंच ट्यूब टाइप टायर आहे, जो 16 इंच स्पोक व्हिल्सवर लावण्यात आला आहे. याशिवाय यात कस्टम फ्री-फ्लो एक्जॉस्ट सिस्टम देण्यात आली आहे. ही बाईक पुर्ण काळ्या रंगात पेंट करण्यात आलेली आहे. क्रोम हेडर पाईपने कंट्रास्ट निर्माण होते.

Image Credited – Amarujala

बाईकमध्ये येणाऱ्या ट्विन-पॉड इंस्ट्रूमेंट पॅनेलला पुर्णपणे काढून टाकण्यात आलेले आहे. बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, यात 648 cc पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. जे 47 PS पॉवर आणि 52 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळतो. किंमतीबद्दल सांगायचे तर इंटरसेप्टर 650 बाईकला मॉडिफाय करण्यासाठी 1.90 लाख रुपये खर्च आला. तर या कामासाठी 2 ते 3 महिने लागतात.

Leave a Comment