आता ट्विटही करता येणार शेड्यूल


जगात सर्वात जास्त चर्चेत असणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ट्विटरची ओळख आहे. जगभरातील राजकारणी, सेलिब्रेटीज याच माध्यमाचतून सर्वाधिक व्यक्त होत असतात. त्यात आता सोशल मीडिया जगतात सुरु असलेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या युजर्ससाठी ट्विटर दरवेळेस नवनवीन अपडेट देत असते. त्यातच ट्विटरने आता ट्विट शेड्यूल करता येणारे नवीन फिचर आणले आहे. याआधीही कंपनीने अनेक नवीन फीचर्स दिले असल्यामुळे ट्विट करणे आता पूर्वीपेक्षा जास्त सोयीस्कर झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरने अपमानस्पद ट्विट आणि ट्रोलिंगला थांबवण्यासाठी नवीन फीचरची चाचणी सुरू केली आहे. सध्या या फिचरचे अपडेट काही मोजक्या डेस्कटॉप यूजर्संना मिळाले आहे. कंपनी लवकरच इतर युजर्ससाठी हे फिचर देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आणखी एक नवीन फिचर घेऊन येण्याच्या तयारीत ट्विटर असून सध्या त्यावर काम सुरू आहे. युझर्संना ट्विट करण्यापूर्वी कन्टेटमध्ये बदल करता येणार आहे. या नव्या फिचरमुळे आपत्तीजनक कन्टेटवर आळा बसेल असे मत कंपनीने व्यक्त केले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार हे तिन्हीही फिचर सर्वात आधी IOS यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment