माउंट एव्हरेस्टवर मालकी दाखवणाऱ्या चीनला नेटकऱ्यांनी फटकारले

चीनचे सरकारी टिव्ही चॅनेल सीजीटीएनने आपल्या ट्विटर हँडलवरून माउल एव्हरेस्टचे फोटो शेअर करत हा भाग चीनचे स्वायत्त क्षेत्र तिबेटमध्ये येत असल्याचा दावा केला होता. आता यावरून भारत आणि नेपाळमधील नेटकऱ्यांनी चीनवर फेक न्यूज पसरवण्यावरून टीका केली आहे. यानंतर #BackOffChina ट्विटर ट्रेंड होत होते.

अनेक युजर्सनी #BackOffChina वापरत ट्विट केले की, खोटी माहिती पसरवणे बंद करा. माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये आहे, चीनमध्ये नाही.

आणखी एका युजरने ट्विट केले की, हा आमचा माउंट एव्हरेस्ट आहे. तुम्ही याला स्वतःचे म्हणावे असे आम्हाला वाटत नाही. नेपाळच्या सरकारने त्वरित यावर कारवाई करावी. हे अस्विकार्य आहे.

सीजीटीएनने 2 मे ला ट्विट केले होते की, अविश्वसनीय असा सुर्याचे दृश्य माउंट एव्हरेस्टवर पाहण्यास मिळाले. सोबत माउंट एव्हरेस्ट हे चीनच्या स्वायत्त क्षेत्र तिबेटमध्ये असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर नेटकऱ्यांनी खोटी माहिती पसरवण्यावरून चीनला ट्रोल केले आहे.

1960 मध्ये नेपाळ आणि चीनमध्ये सीमा वादावरून करार झाला होता. ज्यानुसार माउंट एव्हरेस्ट दोन भागात विभागण्यात आलेले आहे. याद्वारे दक्षिणेकडील भाग नेपाळचा तर उत्तरेकडील तिबेटमधील भागावर चीन दावा करत असते.

Loading RSS Feed

Leave a Comment