मजूर उपाशी राहू नये म्हणून या आजी अवघ्या 1 रुपयात देतात इडली

लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेले मजूर रस्त्याने चालत आपआपल्या घरी निघाले आहेत. रस्त्यात मिळेत ते खात हे मजूर घरी परतत आहे. अनेकजण या मजूरांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. तामिळनाडूतील एक 85 वर्षीय आजीबाईंनी देखील या कठीण काळात लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.

तामिळनाडूच्या कोयंबतूर शहरापासून 20 किमीवरील वाडीवल्लमपालम गावातील 85 वर्षीय कमलाथल मागील अनेक वर्षांपासून अवघ्या एक रुपयात सांभर आणि चटणीसह इडली विकत आहेत. आता लॉकडाऊनमध्ये देखील त्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. एवढ्या दिवस दुकान बंद असताना देखील त्यांनी इडलीचा भाव न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या या स्थिती परिस्थिती खूप अवघड आहे. मी इडली 1 रुपयांमध्येच देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक मजूर अडकले आहेत. मी देखील 1 रुपयांमध्ये इडली देत त्यांची मदत करत आहे.

रिपोर्टनुसार, कमलाथल यांनी 30 वर्षांपुर्वी इडली विकण्यास सुरूवात केली होती. लॉकडाऊनच्या आधी त्या दररोज 1000 इडली बनवत असे. विशेष म्हणजे हे सर्व काम त्या एकट्या करतात. मजूर आणि त्यांच्या कुटुंबाने इडली खरेदी करावी म्हणून अवघ्या 1 रुपयात त्या विक्री करतात.

Leave a Comment