लाऊड स्पीकरवरील अजानवर जावेद अख्तर यांचे भाष्य; नेटकऱ्यांनी केले समर्थन


ट्विटरवरील आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर कायमच चर्चेत येत असतात. नुकतेच अजानविषयी भाष्य करणार एक ट्विट त्यांनी केले होते. लाऊड स्पीकरवर मोठ्या आवाजात अजान लावल्यामुळे त्याचा अनेकांना त्रास होत, असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांच्या मते जावेद अख्तर यांचे मत योग्य आहे. तर त्यांचे हे मत काहींना पटलेले दिसत नाही.


नुकतेच जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी, भारतात लाऊड स्पीकरवर अजान लावणे ५० वर्षांपर्यंत हराम होते. पण ते कालांतराने हलाल झाले. त्याचबरोबर ते अशा प्रकारे हलाल झाले की त्याला कोणतीही सीमा राहिली नाही. अजान करणे चांगली गोष्ट आहे. पण लाऊड स्पीकरवर अजान लावल्यामुळे त्याचा इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे मला आशा आहे की या परिस्थितीत नक्कीच बदल घडेल, असे म्हटले आहे.

जावेद यांच्या या ट्विटला काही नेटकऱ्यांनी त्यांचे समर्थन केले असून आम्ही तुमच्या मताशी सहमत असल्याचे काही जण म्हणाले आहेत. तर काही जणांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यातील काही नेटकऱ्यांनी, एखाद्या गोष्टीवर जर बंदी आणायचीच असेल तर लाऊड स्पीकरवर पूर्णपणे बंदी आणा. मग ती गणेश चतुर्थी असो किंवा अजान. कोणत्याही धर्माचे कोणतेही कार्य असले तरी लाऊड स्पीकर बंदच ठेवला पाहिजे, असे म्हटले आहे.

Leave a Comment