मैत्रीच्या दिशेने इस्रायलचे आणखी एक पाऊल; रस्त्याला दिले रविंद्रनाथ टागोर यांचे नाव

गुरूवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या 159 व्या जयंती निमित्ताने इस्रायलने तेल अवीव येथील एका रस्त्याला त्यांचे नाव देत त्यांना ट्रिब्यूट दिला आहे. याबाबतची माहिती भारतातील इस्रायल कार्यालयाने ट्विट करत दिली.

अधिकृत अकाउंटवरून ट्विट करत माहिती देण्यात आली की, आम्ही आज आणि नेहमीच रविंद्रनाथ टागोर यांचा सन्मान करतो. मानवजातीच्या त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी तेल अवीवमधील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

7 मे रोजी टागोर यांच्या जयंती निमित्ताने इस्रायलने रस्त्याला टागोर स्ट्रीट नाव दिले आहे. इस्रायलने टागोर यांच्या सन्मानार्थ उचललेल्या पावलाचे नेटकऱ्यांनी देखील कौतूक करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mamo Chitte | Amaar Bela Je Jaaye | Balcony Concert | Nandy Sisters | Rabindra Jayanti

Today is the 159th birth anniversary of the Bard Of Bengal – Kobiguru Rabindranath Tagore. Had there been no lockdown, there would have been little cultural functions all around west Bengal today. Here's our little cultural function – a tribute to the Kobi guru from our Balcony ! This is just a humble attempt at spreading positivity ! We will get through this together, fam!P.S. : Pardon our mistakes. We are still learning. Happy Rabindra Jayanti !!- Love, Antara and Ankita

Posted by Antara Nandy on Thursday, May 7, 2020

टागोर यांच्या जयंतीनिमित्ताने लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या चाहत्यांनी देखील बाल्कनी कॉन्सर्टद्वारे त्यांना ट्रिब्यूट दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment