लॉकडाऊननंतर फॅक्टरी सुरू करण्यासाठी ‘ही’ आहेत मार्गदर्शक तत्वे

लॉकडाऊनमध्ये सुट दिल्यानंतर देशात दोन-तीन फॅक्टरी सुरू करताना घडलेल्या घटनानंतर केंद्राने सुरक्षेसाठी दिशा-निर्देश जारी केले आहेत. सरकारने विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात नियमावली जारी केली आहे.

सामान्य दिशानिर्देश –

  1. लॉकडाऊननंतर फॅक्टरी सुरू झाल्यानंतर पहिला आठवडा ट्रायल पीरियड समजला जातो. फॅक्टरी व्यवस्थापन सर्व सुरक्षा मानदंडांचे पालन करेल आणि पहिल्याच आठवड्यात अधिक उत्पादन साध्य करण्याचा प्रयत्न करणार नाही.
  2. धोका कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मशीनद्वारे येणारे आवाज, वास, तार, वायब्रेशन, लीक, धूरावर लक्ष ठेवतील व गरज पडल्यास फॅक्टरी बंद करावी. सर्व मशीन्सची वेळोवेळी तपासणी केली जाईल.
  3. जर एखाद्या कारखान्यात काही समस्या आहे व स्थानिक स्तरावर निदान शक्य नसल्यास जिल्हा मॅजिस्ट्रेटशी संपर्क करावा.

विशेष उद्योगांसाठी दिशानिर्देश –

  1. कच्चा मालाच्या स्टोरेजची तपासणी करण्यात यावी. लॉकडाऊनमध्ये हा माल खराब तर झाला नाही हे तपासावे. जे सामान तसेच राहिले होते, त्यावर रासायनिक प्रकियेद्वारे विषारी पदार्थ तर तयार झाला नाही, हे पाहावे.
  2. स्टोरेज भागात प्रकाश आणि हवा येण्याची विशेष सोय करावी. सप्लाय पाईपलाईन, वॉलव्स, कन्वेयर बेल्टची तपासणी करावी.

उत्पादन कंपन्यांसाठी दिशानिर्देश –

  1. फॅक्टरी सुरू करण्यापुर्वी औद्योगिक परिसराचे सेफ्टी ऑडिट करावे.
  2. सर्व पाईपलाईन, उपकरण आणि डिस्चार्ज लाईनची सफाई करावी. एअर प्रेशर आणि वॉटर प्रेशरची सफाई करावी.
  3. बॉयलर/फ्यूरेंसचा वापर करण्यापुर्वी तपासावे. प्रेशर आणि टेम्प्रेचरच्या मशीन व्यवस्थित काम करत आहेत का, ते पाहावे.
  4. ज्वलनशील आणि विषारी पदार्थांविषयी विशेष काळजी घ्यावी. गरज पडल्यास इमर्जेंसी टीम लवकरात लवकर पोहचेल याची काळजी घ्यावी.

कामगारांसाठी दिशानिर्देश –

  1. फॅक्टरी परिसरात 24 तास सॅनिटायझेशन प्रक्रिया सुरू राहावी. लंच रूम, कॉमन रुम, मीटिंग हॉलला दर 2-3 तासांनी सॅनिटायझ करावे.
  2. सर्व कर्मचाऱ्यांचे दिवसातून दोनदा तापमान तपासावे. ज्या कामगार, मजूरांमध्ये असामान्य लक्षण दिसत असेल, त्यांनी कामावर येऊ नये.
  3. सर्व कर्मचाऱ्यांसाठी हँड सॅनिटायझर्स, हातमोजे आणि मास्कची व्यवस्था करावी. वर्क प्लोर आणि डायनिंग हॉलमध्ये फिजिकल डिस्टेंसिंगचे पालन करावे.
  4. प्रवास करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन करावे. 9- व्यवस्थापकीय व प्रशासकीय सेवेत एका शिफ्टमध्ये एकूण 33 टक्केच कर्मचारी असतील. शक्य असल्यास वर्क स्टेशन शेअर करू नये.

Leave a Comment