नेदरलँडमध्ये अशा प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत डिनर


जगभरातील 212 देशांना जीवघेण्या कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जगभरातील बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन लागू आहे. पण काही देशांनी आपल्याकडील कोरोनाची तीव्रत कमी होत असल्याचा अंदाज घेत लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नेदरलँडमध्ये देखील कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर तेथील रेस्टॉरंट्स उघडण्यात आली आहेत.

पण येथील रेस्टॉरंट्स मालकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एक अनोखी आयडिया वापरली आहे. तेथील एका रेस्टॉरंट्ने आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी अशीच आयडिया वापरली आहे. आता तुम्ही म्हणाल काय फेकता राव… पण असे आम्ही नाही तर हे फोटो तसे सांगत आहेत.

नेटरलँडची राजधानी असलेल्या अॅमस्टरडॅममधील मीडियॉटिक ईटीएन असे या रेस्टॉरंट्चे नाव आहे. येथे आलेल्या ग्राहकांच्या बसण्यासाठी काचेची एक छोटीशी केबिन बनविण्यात आली आहे. ज्यात दोन लोक आरामशीर बसू शकतात आणि डिनरचा आस्वाद घेऊ शकतात.

पण येथील वेटर ग्राहकांना सेवा देताना सुरक्षेची सर्व काळजी घेत आहेत. म्हणजे हातमौजे, मास्क घालूनच येथील वेटर लोकांना सेवा देत आहेत. त्याचबरोबर सोशल डिस्टनिंगचे काळजीपूर्वक पालन करत आहेत. सोशल डिस्टनिंगसाठी तेथील टेबलवर एक बोर्ड ठेवण्यात आला आहे. ज्यावर हे वेटर खाण्याचे पदार्थ व इतर वस्तू लांबूनच ठेवत आहेत. जेणेकरून त्यांचा स्पर्श कोणत्याही ग्राहकाला होऊ नये.

दरम्यान अशा प्रकारची आयडिया प्रायोगिक तत्वावर इतरही रेस्टॉरंट्समध्ये राबवले जात आहेत. यावर रेस्टॉरंट्स मालक म्हणतात की, आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी काचेचे केबिन बनविण्यात आले आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत ग्राहकांना कशा पद्धतीने चांगली सेवा पुरवता येईल, याचे आम्ही निरीक्षण करत आहोत.

तसेच केबिनमध्ये डिनरचा आस्वाद घेणाऱ्या ग्राहकांना तत्वतः शाहाकारीच मेनू दिला जाता आहे. ही सेवा फक्त चाचपणीसाठी सुरु करण्यात आली असून येथे ही सेवा आम्ही कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय आणि आमच्या मित्रपरिवारांना देखील देत आहोत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी रेस्टॉरंट्च्या संकेतस्थळाला भेट दिली असता या काचेच्या केबिनचे आरक्षण फुल्ल झाली आहेत.

Leave a Comment