गुजरातमधील आपले मुख्यालय मुंबईत हलवणार आयसीआयसीआय बँक


मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या काल झालेल्या संचालक बैठकीत गुजरातमधून बँकेचे मुख्यालय महाराष्ट्रात हलवण्यात येणार असून महाराष्ट्रात आयसीआयसीआय बँकेचे भागधारक मोठ्या प्रमाणावर असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेने त्यासंदर्भातील माहिती मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला दिली आहे.

वडोदरातील मुख्यालय मुंबईत हलवण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. बँकेचे कोणतेही कर्मचारी किंवा वडोदऱ्यातील कोणत्याच व्यवसायात बदल केलेला नाही. हा बदल फक्त पेपरवरती करण्यात आल्याचे बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गुजरातमधील मुख्यालय हलवल्यामुळे आयसीआयसीआय बँक कार्पोरेट इनकम टॅक्स आता मुंबईला देणार आहे. केंद्रीय करात वाढ होणार असून तो महाराष्ट्रात येणार आहे. तसेच मोठ्या कार्पोरेट कर्जावर स्टॅम्प ड्युटी देखील महाराष्ट्रात भरली जाणार आहे.

शनिवारी आयसीआयसीआय बँकेच्या संचालकांची बैठक पार पडली. त्यात सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या निर्णयाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. तसेच बँकेचे मुख्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते, त्याचबरोबर काही औपचारिकता पण पूर्ण कराव्या लागतात. त्यापूर्ण केल्या जाव्यात असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment