लॉकडाऊनमध्ये असा अविस्मरणीय बनवा मातृदिन

आई या शब्दाबद्दल, व्यक्तीबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. वर्षातील एक दिवस हा आईसाठी खास समर्पित असतो, तो म्हणजे मदर्स डे अर्थात मातृदिन. दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी हा खास दिवस साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मातृदिन वेगळा असेल. आईसाठी हा दिवस खास बनविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न केला जातो. मात्र लॉकडाऊनमुळे बाहेर जाणे शक्य नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्याद्वारे तुम्ही घरातच राहून मातृदिन खास बनवू शकता.

आईसोबतच्या फोटोंचा शॉर्ट व्हिडीओ –

आईसोबतच्या जुन्या फोटोंचा तुम्ही मोबाईल अ‍ॅपद्वारे शॉर्ट व्हिडीओ बनवू शकतात. व्हिडीओमध्ये तुम्ही आईवर आधारित एखादे सुंदर गाणे देखील टाकू शकता.

आईसाठी तिच्या आवडीचे जेवण –

आई नेहमीच आपल्या आवडी-निवडीची काळजी घेत असते. या मातृदिनाच्या निमित्ताने तुम्ही आईसाठी आपल्या हाताने आवडीचे जेवण बनवून खास सरप्राईज देऊ शकता.

स्वतःच्या हाताने बनवलेले कार्ड –

या मातृदिनी तुम्ही तुमच्या आईसाठी स्वतःच्या हाताने सुंदर क्रिएटिव्ह कार्ड बनवू शकता. कार्डद्वारे तुम्ही आईचे आभार मानू शकता. सोशल मीडियाच्या काळात हँडमेड कार्ड व त्यातील संदेश आईला नक्कीच आनंद देईल.

आईला घर कामात ब्रेक द्या –

वर्षभर आई घरात काम करत असते. मात्र या दिनानिमित्त तुम्ही आईला कामातून सुट्टी देऊ शकता. लॉकडाऊनमुळे सर्व लोक घरात आहेत, त्यामुळे तुम्ही घरात सफाई करू शकता, जेवण बनवू शकता. हे नक्कीच चांगले गिफ्ट असेल.

Leave a Comment