पीएम किसान योजनेंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांना फायदा, तुम्ही पण करू शकता अशी नोंदणी

सरकारने मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर पीएम-किसान योजनेंतर्गत 9.13 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,253 कोटी रुपये जमा केले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पीएम किसान योजनेंतर्गत सरकार पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन टप्प्यात 6 हजार रुपये खात्यात टाकणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारने पहिला हप्ता खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला होता. जर तुम्ही देखील शेतकरी असाल, तर तुम्ही देखील या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकाल.

या योजनेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन लॉग इन करावे. वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नरवर गेल्यावर ‘New Farmer Registration’ पर्याय मिळेल. येथे आधार नंबर टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुर्ण करावी लागेल. या वेबसाईटवर तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता व सोबतच लाभार्थींची यादी पाहू शकता.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करत माहिती दिली की, लॉकडाऊनच्या काळात मार्च 2020 पासून ते आतापर्यंत सरकारने 9.13 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम-किसान योजनेंतर्गत 18,253 कोटी रुपये टाकले आहेत. एकूण 4,22,113 कोटी रुपये कृषि कर्ज घेणाऱ्या 3 कोटी शेतकऱ्यांनी तीन महिन्यांच्या मोराटोरियमचा लाभ घेतला आहे.

Leave a Comment