आईच्या दुधापासून कोरोनाची अँटीबॉडी बनविणे शक्य, रिसर्चमध्ये दावा

लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. लस बनविण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आता याचाच भाग म्हणजे आईच्या दुधापासून कोरोनावरील उपचार शक्य असल्याचा दावा केला जात आहे. द जर्नल ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला असून, आईच्या दुधापासून अँटॉबॉडी बनवून त्याचे परिक्षण करण्यात आले आहे.

रिसर्चद्वारे समोर आले की, संक्रमित महिलेच्या दुधात कोरोना व्हायरसचे अँटीबॉडी असू शकतात. जे बाळांचा संक्रमणापासून बचाव करतात. याच कारणामुळे संक्रमित महिलांना आपल्या बाळांना स्तनपान सुरू ठेवण्यास सांगितले जाते.

संशोधकांनी दावा केला आहे की, दुधाच्या माध्यमातून संक्रमण होत नाही. त्यामुळे दुधात नक्कीच अँटीबॉडी असू शकतात. या रिसर्चचे नेतृत्व करणारे द इकना स्कूल ऑफ मेडिसनचे रेबेका पॉवेल यांनी ही माहिती दिली.

डॉक्टरांनुसार, कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर काही बाळांमध्ये दुर्मिळ, जीवघेणे लक्षण विकसित होत आहेत. ज्याला संशोधक पीडियाट्रिक मल्टी-सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम म्हणत आहेत. डॉक्टरांना लहान बाळांमध्ये अनेक विकार आढळत आहेत, जे त्यांच्या शारीरिक अंगाना प्रभावित करू शकते.

Leave a Comment