5 लाखांच्या बजेटमध्ये या आहेत चांगल्या कार्स

भारतीय बाजारात जगभरातील ऑटोमोबाईल कंपन्या नवनवीन स्वस्तातल्या कार्स लाँच करत आहेत. तुम्ही देखील जर स्वस्तातील शानदार फीचर्स असणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला अशाच 4 सर्वोत्तम कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 5 लाखांपेक्षा कमी आहे. या कार्सविषयी जाणून घेऊया.

Image Credited – cardekho

मारुती सुझुकी एस-प्रेसो –

या कारमध्ये 998cc इंजिन देण्यात आले आहे. जे 5500 Rpm वर 67 Hp पॉवर आणि 3500 Rpm वर 90 Nm टॉर्क जनरेट करते. कारच्या डायमेंशनबद्दल सांगायचे तर याची लांबी 3565mm, रुंदी 1520mm, उंची 1564mm, व्हिलबेस 2380mm, सीटिंग कॅपेसिटी 5 सीटर, वजन 767 किलो आणि फ्यूल टँक कॅपेसिटी 27 लीटर देण्यात आली आहे. मारुती सुझुकी एस-प्रेसोची किंमत 3,69,000 रुपये (एक्स शोरुम) आहे.

Image Credited – cardekho

रेनॉल्ट क्विड बीएस-6 –

रेनॉल्ट क्विडमध्ये 799cc 3 सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. जे  5678 Rpm वर 53.26 Hp पॉवर आणि 4386 Rpm वर 72 Nm टॉर्क जनरेट करते. डायमेंशनमध्ये क्विडची लांबी 3679mm, रुंदी 1579 mm, उंची 1478mm, ग्राउंड क्लियरेंस 180mm, व्हिलबेस 2422mm, सीटिंग कॅपेसिटी 5 सीटर आणि फ्यूल टँक कॅपेसिटी 28 लीटर आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 2,92,290 रुपयांपासून सुरू आहे.

Image Credited – India Today

मारुती सुझुकी अल्टो –

मारुती सुझुकी अल्टोमध्ये 796cc 3 सिलेंडर इंजिन मिळेल. जे 6000 Rpm वर 47.33 Hp पॉवर आणि 3500 Rpm वर 69 Nm  टॉर्क जनरेट करते. Alto ची लांबी 3445mm, रुंदी 1490mm, उंची 1475mm, व्हिलबेस 2360 mm, सीटिंग कॅपेसिटी 5 सीटर, एकूण वजन 1185 किलो आणि फ्यूल टँक कॅपेसिटी 35 लीटर आहे.  तर मारुती सुझुकी अल्टोची सुरूवाती एक्स शोरूम किमत 2,94,800 रुपये आहे.

Image Credited – Maruti Suzuki

मारुती सुझुकी वॅग्नॉर –

मारुती सुझुकी वॅग्नॉरमध्ये 998cc 3 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 5000 Rpm वर 58.33 Hp पॉवर आणि 3500 Rpm वर 78 Nm टॉर्क जनरेट करते. डायमेंशनबद्दल सांगायचे तर वॅग्नॉरची लांबी 3655mm, रुंदी 1620mm, ऊंचाई 1675 mm, व्हिलबेस 2435mm, टर्निंग रेडिएस 4.7 मीटर, वजन 1340 किलो आणि सीटिंग कॅपेसिटी 5 सीटर आहे. या कारची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 4,45,500 रुपये आहे.

Leave a Comment