कोरोनाच्या लढाईत सर्वाधिक दान करणाऱ्यांच्या यादीत ही एकमेव भारतीय व्यक्ती

जगभरात सध्या कोरोना व्हायरस महामारीने थैमान घातले आहे. या संकटाशी लढण्यासाठी जगभरातील 80 पेक्षा अधिक अब्जाधीशांनी मोठ्या प्रमाणात दान केले आहे. विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी देखील या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अझीम प्रेमजी हे कोरोनाच्या लढाईत सर्वाधिक दान करणाऱ्यांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानी आहेत.

या लढाईत सर्वाधिक दान करणाऱ्यांमध्ये ट्विटरचे संस्थापक जॅक डॉर्सी पहिल्या आणि मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स दुसऱ्या स्थानी आहेत. तिसऱ्या क्रमांकावर एकमेव भारतीय अझीम प्रेमजी असून, 132 मिलियन डॉलर (जवळपास 1 हजार कोटी रुपये) दान केले आहेत.

कोरोनाच्या लढाईत सर्वाधिक दान करणारे टॉप-10 व्यक्ती –

  1. जॅक डॉर्सी-  7500 कोटी रुपये
  2. बिल आणि मेलिंडा गेट्स – 1912 कोटी रुपये
  3. अझीम प्रेमजी –  990 कोटी रुपये
  4. जॉर्ज सोरोस – 975 कोटी रुपये
  5. एँड्य्रू फॉरेस्ट – 970 कोटी रुपये
  6. जेफ स्कोल- 970 कोटी रुपये
  7. जेफ बेझॉस-  970 कोटी रुपये
  8. मायकल डेल – 970 कोटी रुपये
  9. मायकल ब्लूमबर्ग – 558 कोटी रुपये
  10. लिन अँड स्टॅसी शुस्टरमॅन – 525 कोटी रुपये

Leave a Comment