यांच्याकडे आहे 10 लाख कोटी, तरीही मिळत नाही आहे गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी

अमेरिकन बिझनेस टायकून आणि गुंतवणूकदार वॉरेन बफे म्हणाले की, त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवे जवळ पर्याप्त मात्रेत रक्कम आहे. मात्र सध्या अशी कोणतीच कंपनी नाही, जी गुंतवणुकीसाठी आकर्षक असेल. सध्या कोणतीही गुंतवणूक करण्यात आलेली नाही. कारण आता काहीही गुंतवणूक करण्यासाठी योग्य नाही.

ते म्हणाले की, स्थिती खूप लवकर बदलू शकते अथवा बदलू देखील शकत नाही. मार्च तिमाहीच्या अखेरीस बर्कशायरजवळ 13,700 कोटी डॉलरची (जवळपास 10 लाख कोटी रुपये) रक्कम होती. कोरोना व्हायरसमुळे अनेक स्टॉक घसरले आहेत. बर्कशायरचे शेअरहोल्डर बफे काही गुंतवणूक करतील, याची वाट पाहत आहेत.

एसअँडपी 500 फेब्रुवारीमध्ये रेकॉर्ड स्तर 35 टक्के खाली आली होते. याआधी जेव्हा जेव्हा शेअर्स घसरले आहेत, तेव्हा तेव्हा बफे यांनी संधीचा फायदा घेत कंपनीमध्ये आंशिक मालकी खरेदी केली आहे. 2008 मध्ये देखील आर्थिक संकटाच्या काळात त्यांनी बँक ऑफ अमेरिका आणि गोल्डमॅन सॅक्स सारख्या संस्थांमध्ये गुंतवणूक केली होती. बफे म्हणाले की, आम्हाला काहीतरी मोठे करायचे आहे. 3 ते 5 हजार कोटी डॉलर्सची गुंतवणूक करायची आहे. मात्र सध्याच्या स्थितीत कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य नाही. अमेरिका हा मजबूत देश असून, यात कोरोना सारख्या संकटाशी सामना  करण्याची क्षमता आहे. कोणतेही आव्हान अमेरिकेला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही.

ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, बफे हे 7,200 कोटी डॉलर म्हणजेच 5.40 लाख कोटी रुपये संपत्तीचे मालक आहेत.

Leave a Comment