सरकारी मदतीशिवाय हजारो गावकऱ्यांनी मिळून बांधला 1 कोटींचा पूल

सर्वसाधारणपणे रस्ते, पूल अशा पायाभूत सुविधांची निर्मिती करणे सरकारची जबाबदारी असते. मात्र आसाममधील गावकऱ्यांनी सरकारच्या भरवश्यावर न राहता स्वतः निधी जमवत चक्क पूल बांधला आहे.

आसामच्या कामरूप जिल्ह्यातील जलजली नदीवर हा पूल बनविण्यात आला असून, यासाठी 1 कोटी रुपये खर्च आला. 335 मीटर लाकडी पूल बांधण्यासाठी 10 गावातील 7 हजार लोकांनी यासाठी निधी जमा केला होता. 2018 पासून या या लाकडी पूलाचे काम सुरू होते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढते. अशा वेळी पुलाच्या मदतीने लोक दुसऱ्या गावात जाऊ शकतात. मुले शाळेत जाऊ शकतात.

याआधी देखील आसाममधील दिहामलाई भागातील गावकऱ्यांनी मिळून पूल बांधला होता. हा पूल 4 गावांना जोडतो. हा पूल देखील विना सरकारची मदत घेता, गावकऱ्यांनी स्वतः बांधला होता.

Leave a Comment